मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाटा बनतोय अवैध धंद्याचे केंद्रबिंदू?
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज, अक्षय काठोके | मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाटा बनतोय अवैध धंद्याचे
केंद्रबिंदू बनत असल्याचे चित्र आहे.
याबाबत अधिकृत असे की मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्नाड फाटा मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेला असून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला परंतु मध्य प्रदेशात खुल्या बाजारात विकल्या जाणारा कोट्यवधींचा विमल गुटखा, गांजा तसेच इतर अमली पदार्थाची दररोज वाहने मध्य प्रदेशातून संपूर्ण महाराष्ट्रभर पुरणाड फाट्याद्वारे येत असतात. या मार्गाद्वारे अशीच लाखो, कोट्यावधींची अमली पदार्थांची वाहतूक होत असते.
परंतु यावर स्थानिक मुक्ताईनगर पोलीस कर्मचारी कुठलीही कारवाई करत नसल्याने याबाबत जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब यांनी लक्ष घालण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.


