भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकारावेर

सावदा नगरपालिकेतून माहिती देण्यास टाळाटाळ, गौडबंगाल काय?

सावदा, ता रावेर. मंडे टु मंडे न्युज | रावेर तालुक्यातील सावदा नगरपालीका ही परसरातच नव्हे तर राज्यात एक चांगली नगरपालिका म्हणून परिचित आहे. असे असताना सावदा नगरपालिके मध्ये माहिती साठी केलेल्या अर्जांवर माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असून असे कित्येक अर्ज गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहेत मात्र त्यावर उत्तरे दिली जात नाहीत. माहिती अधिकारात सुद्धा माहिती मागितली असता टाळाटाळ करून कुठलेही कारण दाखवत बांधकाम विभागातून अर्ज निकाली काढले जातात. माहिती देण्यास का टाळाटाळ केली जात आहे? काही गौडबंगाल तर नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिकेकडे बांधकाम विभागाकडून माहिती अधिकारात माहिती मागितली असता अर्जात माहिती बाबत स्पष्ट मागणी नमूद असताना ते आमच्याकडे नाही, ते दुसऱ्या विभागाकडे आहे, असे म्हणत माहिती देण्यात मुद्दामहून विलंब करून टाळाटाळ केली जाते. आणि शेवटी कारण सांगत बांधकाम विभागाच्या अभियंता यांचे कडून अर्ज निकाली काढून माहिती दिली जात नाही. वेळ काढूपणा करत माहिती देण्यास का टाळाटाळ केली जाते. काही लपवले जात तर नाही ना?  यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशी काही अर्ज पालिकेत गेल्या कित्येक वर्षांपासून पडून आहेत त्यावर प्रोसिजर सुरू आहे असे सांगितले जाते. नगरपालिकेच्या अशा भोंगळ करभाराकडे मुख्याधिकारी/ प्रशासक यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!