भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीता सह “जय जय महाराष्ट्र माझा” हे राज्य गीत होणे बंधनकारक

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जाहीर केलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा हा एक म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्य मंडळाबाहेरील संस्थांसह सर्व शाळांमध्ये ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत अनिवार्य केले आहे. महाराष्ट्राचे वारसा आणि भाषेचा अभिमान वाढवण्यासाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी म्हटले की, राष्ट्रगीत हा दैनंदिन शालेय दिनचर्येचा अनिवार्य भाग बनेल. याव्यतिरिक्त, आम्ही सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मराठीची अंमलबजावणी बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहोत. एकनाथ शिंदे सरकारने या गीताला राज्य गीत म्हणून मान्यता दिली आहे.

शिक्षण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी, मराठी भाषा अनिवार्य केल्यानंतर आता राज्यगीताचा समावेश बंधनकारक केला आहे. शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजवावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शालेय वयापासून महाराष्ट्राचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि भौगोलिक महत्त्व समजून घेता येईल, असे भुसे यांनी सांगितले. राज्यगीताचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा अभिमान जागवणे आणि राज्याच्या परंपरांचा सन्मान करण्याची भावना रुजवणे हा आहे. शाहीर साबळे यांनी गायलेले आणि राजा बढे यांनी लिहिलेले हे गीत महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक मानले जाते.

राज्यगीताचा निर्णय यापूर्वी राज्य सरकारने सर्व शाळांसाठी लागू केला होता. मात्र, आता त्याची व्याप्ती वाढवत केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्येही ते सक्तीचे करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री भुसे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक शाळेत हे गीत वाजलेच पाहिजे. विद्यार्थ्यांना शालेय वयापासून राज्याची ओळख व्हावी, यासाठी राज्यगीताचा समावेश आवश्यक आहे. मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्ये याबाबत ठोस कार्यवाही होत नसल्याची टीका होत असताना, राज्यगीत वाजवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यगीतामुळे विद्यार्थ्यांवर महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीची शिकवण कायम राहील, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!