सरकार जाऊन तीन वर्षे झाली, तरीही वीज बिलांवर ठाकरेच मुख्यमंत्री ; महावितरणाच्या बिलावर अजूनही उद्धव ठाकरेंचा फोटो
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सन २०२२ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरुन पायऊतार झाले. त्यानंतर शिवसेनेतील बंडामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाले होते. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले आहे. तसेच, आता मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले आहेत. असे असताना जळगाव येथील या घटनेने एकच खळबळ उडवून दिली. जळगावात महावितरणनं पाठवलेल्या वीजेच्या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. वीज बिलांवर ठाकरेंचा फोटो पाहून ग्राहक शॉक झाले. हा प्रकार समोर आल्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना चांगलाच करंट बसला
जळगावात महावितरणकडून घरोघरी पाठविलेल्या विज बिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यात वाद सुरू झाल्याचे पाहायाला मिळत आहे.
महावितरण कडून जळगाव मध्ये ग्राहकांना विज बिलाचे वितरण करण्यात आले आहे. या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून आजही उद्धव ठाकरे यांचा फोटो छापण्यात येत आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देखील यामुळे शॉक बसला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. हा प्रकार समोर येताच चर्चांना एकच उधाण आले आहे. याचे पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत.
जळगावात महावितरणने घरोघरी पाठविलेल्या विज बिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.त्याचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. यावरून भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रविंद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. हे योग्य नाही. हे जर चुकून झाले असेल तर ठिक आहे. मात्र हेतू पुरस्पर या गोष्टी होत असतील तर त्यावर नक्कीच कारवाई केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले आहे.
महावितरणकडून दर महिन्याला वीज बिलाच्या प्रिंटची स्टेशनरी कंत्राटदाराला पुरवण्यात येते. नव्या मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेली स्टेशनरी महावितरणनं छापलेली असली तरी कंत्राटदारानं शहरात चार हजार बिलं जुन्या कागदांवर छापली. आता याची चौकशी केली जात आहे. कंत्राटदाराला नोटीस पाठवण्यात आलेली आहे.