भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

आ.सावकारे यांची कार मंत्र्यांच्या नावावर,आरटीओ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा? चौघे कर्मचारी निलंबित

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परस्पर मंत्र्यांच्या नावावर केल्याच्या गोंधळाच्या चौकशीनंतर जळगावच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील ४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे .

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी श्याम लोही यांनी या गोंधळाची चौकशी केली होती . निलंबित करण्यात आणलेल्या या ४ कर्मचाऱ्यांचे वेतन आता घटवले जाणार आहे . त्यांच्या जळगावातून आता धुळे आणि नंदुरबार येथे बदल्या करण्यात आल्या असल्याचेही सांगण्यात आले . या कर्मचाऱ्यांना आता जनतेशी थेट संपर्क येणार नाही अशा पद्धतीची कामे देण्यात येणार आहे म्हणजे कार्यालयातील अंतर्गत कामांची जबाबदारी त्यांना देण्यात येणार आहे .

दुसरीकडे आमदारांची कार अशी परस्पर दुसऱ्याच्या नावाने करण्याच्या आदेशावर सही करणारे अधिकारीही तेवढेच दोषी आहेत मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवले गेले असल्याची चर्चा परिवहन खात्याच्या प्रशासकीय वर्तुळात आहे . ही कार हस्तांतरित करण्याच्या आदेशाशी थेट संबंध नसलेल्या लेखापालालाही निलंबित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे लेखापालची जबाबदारी हिशोब तपासणीची असते , त्याचा अशा आदेशाशी थेट संबंध येतच नाही ; तरीही त्याला का दोषी ठरवले गेले ? , असा प्रश्न अन्य कर्मचारी विचारत आहेत .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!