जिल्ह्यात कोरोनाचे आकडे चिंता वाढवणारे; आज ११९६ बाधित, १५ रुग्णांचा मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. आजही जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या हजारी पार गेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११९६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९०१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा उच्चांक आहे तर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत मृत्यू झाले आहेत.
जळगाव शहर – ३३२, जळगाव ग्रामीण-०५, भुसावळ- ९९, अमळनेर-९५, चोपडा-३६४, पाचोरा-३०, भडगाव-०९, धरणगाव-६७, यावल-३५, एरंडोल-२८, जामनेर-८४, रावेर-२८, पारोळा-२५, चाळीसगाव-४०, मुक्ताईनगर-०१, बोदवड-२६, इतर जिल्ह्यातील-१० असे एकुण ११९६ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ८३ हजार १६५ पर्यंत पोहचली असून ७० हजार ८७७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५५४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०७३४ रुग्ण सध्या उपचार घेताय.