जळगाव जिल्ह्यात आज १२ रुग्ण कोरोना बाधित
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १२ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे ४६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.
आजची रुग्ण संख्या-
जळगाव शहर – ०३, जळगाव ग्रामीण-००, भुसावळ-०२, अमळनेर-००, चोपडा-००, पाचोरा-०१, भडगाव-०१, धरणगाव-००, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-००, रावेर-००, पारोळा-००, चाळीसगाव-००, मुक्ताईनगर-०४, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण १२ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ५१ हजार ४५५ पर्यंत पोहचली असून १ लाख ४८ हजार ६४४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५९० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २२१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.