सट्टा, जुगार अड्ड्यावर धाड,१८ जुगारीना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। सिंधी कॉलनीतील खुबचंद साहित्या कॉम्प्लेक्समधील दुकानात सुरू असलेल्या सट्टा जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चिंथा यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी धाड टाकली. या धाडीत रोख रकमेसह ५९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमालासह १८ जुगारींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या जुगारींची नावे
ताब्यात घेतलेल्यांमध्ये प्रकाश तोलाराम कुकरेजा (वय ६५, रा. सिंधी कॉलनी), सुरेश ऊर्फ डाबू मामा सिधराम भाट (वय ४८, रा. नेत्रज्योती सोसायटी), रोहित सुरेश भाट (वय २२, रा. नेत्रज्योती सोसायटीजवळ), शांताराम बाबुराव पाटील (वय ६५, रा. तांबापुरा), इम्रान हमीद खान (वय ३८, रा. तांबापुरा), गजानन वसंत लकडे (वय ५२, रा. चंदनवाडी), नीलेश लक्ष्मीनारायण लढ्ढा (वय ५०, रा. विष्णूनगर), विनोद विठ्ठल सपकाळे (वय ४२, रा. समतानगर), पंडित लखीचंद चव्हाण (वय ४१, रा. नेहरुनगर), कैलास झंजेरिया बारेला (वय ४२, रा. कंजरवाडा), अशोक काशिनाथ नेवे (वय ६२, रा. श्रीधरनगर), पांडुरंग भगवान नाभणे (वय ६८, रा. तांबापुरा), मुरलीधर विश्वनाथ चव्हाण (वय ५०, रा. सिंधी कॉलनी), भिका राजू गुंडाळे (वय १८, रा. मेहरुण), अशोक सलामतराय मकडीया (वय ६२, रा. सिंधी कॉलनी), राजू बाबुराव पवार (वय ४२, रा. नेहरूनगर), बुधा मिराजी झणके (वय ४२, रा. समतानगर) व अयुब मेहबूब खाटीक (वय ५५, रा. तांबापुरा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जुगारींची नावे आहे.
हे जुगारी खुबचंद साहित्या कॉम्प्लेक्समधील दुकानात मिलन-डे-ओपन नावाचा सट्टा जुगाराचे आकडे घेत होते. सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथक कारवाई गेले त्यावेळी त्या दुकानात काही व्यक्ती हातात पैसे घेऊन सट्ट्याचे आकडे १० रुपयाने दुर्री लाव असे बोलण्याचा आवाज आल्याने पथकाची खात्री झाली. त्यानंतर पथकाने जुगारींसह मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून जुगारींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.