जिल्ह्यात २० वर्षीय तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव शहराजवळच्या कुसुंबा गावातील एका २० वर्षीय तरुणाने घरातच छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतल्याची घटना आज दुपारी घडली .
प्रमोद रवींद्र खैरनार,वय २० असे या तरुणाचे नाव आहे . आई वडील आणि भाऊ बाहेर गेल्यावर घरात कुणीही नसताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले . त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र लगेच समजू शकले नाही . त्याचा धाकटा भाऊ अमोल खैरनार घरी आल्यावर त्याच्या लक्षात ही घटना आली आणि त्याने छतावरून काढून त्याला ग्रामस्थांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले . तेथे सीएमओ डॉ स्वप्नील कळसकर यांनी त्याला मयत घोषित केले . दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान त्याने आत्महत्या केली असावी असे सांगण्यात आले .
प्रमोदचे आई -वडील रवींद्र खैरनार हे मजुरी करतात . त्याच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे . २ वर्षांपासून प्रमोद कुसूंबा गावात केशकर्तनालयाचे दुकान चालवत होता . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आलेल्या माहितीनुसार एम आय डी सी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.