भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज ३३८ कोरोना बाधित रुग्ण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ३३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर २२१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहरासह भुसावळ, चोपडा आणि चाळीसगाव तालुक्यात रूग्ण संख्या अधिक प्रमाणावर आढळून आल्याचे दिसून येत आहे.

आजची रुग्ण संख्या-
जळगाव शहर-११९, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ-८७, अमळनेर-२०, चोपडा-२६, पाचोरा-२, भडगाव -५, धरणगाव-१३, यावल-६, एरंडोल-०, जामनेर-८, रावेर-३, पारोळा-०, चाळीसगाव-२५, मुक्ताईनगर-५, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ३३८ रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात सध्या ३ हजार २४४ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४७ हजार ८८५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४२ हजार ५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजवर एकुण २ हजार ५८२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. असे आहवालानुसार कळविण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!