आज जळगाव जिल्ह्यात ४१४ रुग्ण कोरोना बाधित
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। आज जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने दिलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात तब्बल ४१४ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून ११६ रूग्ण आढळून आले .
आजची रुग्ण संख्या-
जळगाव शहर-११६, जळगाव ग्रामीण-११, भुसावळ-७९, अमळनेर-२०, चोपडा-७८, पाचोरा-१७, भडगाव-५, धरणगाव-४, यावल-१, एरंडोल-४, जामनेर-३२, रावेर-०, पारोळा-१६, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ४१४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४७ हार ११९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ३१२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार २२६ रूग्ण संक्रमित असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार ५८१ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.