जळगाव जिल्ह्यात आज ६ रुग्ण कोरोना बाधित
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ११ बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
आजची रुग्ण संख्या- जळगाव शहर – १, जळगाव ग्रामीण – ०, भुसावळ – ०, अमळनेर – ०, चोपडा – ०, पाचोरा – ३, भडगाव – ०, धरणगाव – ०, यावल – ०, एरंडोल – ०, जामनेर – १, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ५४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३९ हजार ८६७ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. तर १०४ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.