जळगाव जिल्ह्यात आज ६४ कोरोना बाधित रुग्ण,जिल्ह्यात आतापर्यंत १,४१,७८५ रुग्णसंख्या
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ६४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १३१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ०३, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ-०५, अमळनेर-००, चोपडा-०२, पाचोरा-०४, भडगाव-०१, धरणगाव-०४, यावल-२१, एरंडोल-०३, जामनेर-०२, रावेर-०३, पारोळा-०३, चाळीसगाव-०५, मुक्ताईनगर-०३, बोदवड-०२, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ६४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४१ हजार ७८५ पर्यंत पोहचली असून १३७ हजार ६३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५६६ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १५८३ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.