जळगाव

जिल्हा बँक निवडणुकीत १० जागांसाठी ९४.०८ टक्के मतदान

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालकांच्या १० जागांच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले ९४.०८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक ( सहकार ) संतोष बिडवई यांनी दिली.

जिल्ह्यातील २८५३ मतदारांपैकी २६८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. उद्या सकाळी ८ वाजेपासून जिल्हा बँक येथे मतमोजणी होणार आहे.

कोरोनामुळे दीड वर्ष लांबलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक प्रक्रिया रविवारी १५ मतदान केंद्रावर शांततेत पार पडली. निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्वपक्षिय पॅनलची संकल्पना मांडली.भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तीन बैठकाही झाल्या. मात्र काँग्रेसने अखेरच्या टप्प्यात भाजपासोबत जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट करीत वेगळे पॅनल करण्याचा इशारा दिला. राज्यात भाजपाकडुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना तपास यंत्रणाच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याने राष्ट्रवादीनेही भाजपासोबत जाणार नसल्याची भूमिका घेतली.

अखेर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे महाविकास आघाडीचे सहकार पॅनल रिंगणात उतरले. महाविकास आघाडीत स्थान न मिळालेल्या असंतुष्ट उमेदवारांनी शेतकरी पॅनलच्या झेंड्याखाली त्यांना आव्हान उभे केले. काँग्रेसचे नेते डी.जी. पाटील, राष्ट्रवादीचे विकास पवार, भाजपाचे जि.प. सभापती रवींद्र पाटील यांनी शेतकरी पॅनलचे नेतृत्व केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे ११ उमेदवार आधीच बिनविरोध निश्‍चीत झाले. त्यामुळे उर्वरीत १० जागांसाठी रविवारी मतदान झाले .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!