भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरण विरोधात संपा मुळे जळगाव जिल्‍ह्यात ९६० कोटींचे व्‍यवहार ठप्‍प

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। केंद्र सरकार कडून राष्ट्रीयकृत बँकांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्‍न सुरू असल्याने बँकांचे खाजगीकरण थांबविण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह दहा बँक संघटनांनी दोन दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे.संपात जळगाव जिल्‍ह्यातील जवळपास ८०० अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. या काम बंद मुळे जळगाव जिल्‍ह्यातील सुमारे ९६० कोटी रूपयांचे व्‍यवहार ठप्‍प झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँक अधिकारी व कर्मचारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन व ऑल इंडिया बँकिंग ऑफिसर्स कॉन्फेडरेशनच्या झेंड्याखाली एकत्र येऊन बँक खासगीकरणाच्या विरोधात पुकारलेल्या संपात सहभागी झाले. केंद्र सरकारच्या प्रस्तावित बँकिंग अमेंडमेंट बिल २०२१ मध्ये होऊ घातलेल्या खाजगीकरणाच्या धोरणांच्या विरोधात निदर्शने केली.

संपात जळगाव जिल्‍ह्यातील जवळपास ८०० अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले आहेत. संप असल्याकारणाने बँकेचे कामकाज पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे धनादेश क्लीयरिंगचे अंदाजे ९६० कोटीचे व्यवहार ठप्प झाले असून संप यशस्वी करणेसाठी युनायटेड फोरमचे जिल्हा समन्वयक,स्टेट बँक,सेन्ट्रल बँक,महाराष्ट्र बँक,बँक ऑफ बडोदा,युनियन बँक,फेडरल बँके,इंडियन बँक आदी बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!