भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

कंत्राटदाराकडून लाच स्वीकारताना जळगावातील विद्युत निरीक्षकाला रंगेहाथ पकडले !

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | जळगावातील विद्युत निरीक्षकाला शासकीय कंत्राटदाराचे लायसन्स नूतनीकरणासाठी 15 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जळगाव उद्योग, उर्जा व कामगार विभाग गणेश सुरळकर यांना जळगाव एसीबीने मंगळवारी सायंकाळी कार्यालयातच उशिरा अटक केल्याने सदरील कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जळगावातील उद्योग, उर्जा व कामगार विभाग येथे विद्युत निरीक्षक आसलेल्या गणेश नागो सुरळकर (52, पार्वती नगर, जळगाव) यांनी तक्रारदार जळगावातील 32 वर्षीय कंत्राटदार असून ते शासनाची इलेक्ट्रिकल कामे करतात व त्यांच्याकडे त्यासाठी लायसन्स आहे. या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी आरोपी सुरळकर यांच्याकडे अर्ज केला होता.

लायसन्स नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे मंगळवारी 15 हजारांची लाच मागणी करण्यात आल्यानंतर कंत्रादार तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पंचांसमक्ष लाच स्वीकारताच सुरळकर यांना मंगळवारी सात वाजेच्या सुमारास कार्यालयात रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे व पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!