भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

पत्नीला प्रियसीसाठी घरातून हाकलून लावल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी)। पतीने प्रियसीसाठी दोन मुलांसह पत्नीला घरातून हाकलून लावल्याचा प्रकार समोर आला असून पीडित विवाहीतेने दिलेल्या तक्रारीनुसार तीन जणांन विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्गजवळ बांभोरी नाक्याजवळ वास्तव्यास असलेल्या पीडित विवाहीतेने दिलेल्या तक्रारीनुसार, महिलेचे पती शेतीपयोगी साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. गेल्या काही दिवसांपासून एक महिला घरी यायला लागली. पतीला विचारल्यावर त्यांनी नातेवाईक असल्याचे सांगत होते, मात्र, दोघांचे फोटो पाहिल्यावर दोघांमध्ये संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने सासूला हाप्रकार सांगितलं असता, पतीसह सासूकडून छळाला सुरवात केली. घर घेण्यासाठी भावाकडून दीड लाख रुपये देखील आणून दिल्यावर दाम्पत्याच्या नावे स्वतःचे घर झाले, २३ ऑक्टोबरला पती दिनेश, सासू सरस्वतीबाई यानी अंगावरील दागिने काढून घेत दोन्ही मुलांसह घरातून हाकलून लावले. याप्रकरणी विवाहितेचा फिर्यादीवरून पती, सासू व पतीची प्रेयसी अशा तिघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!