पंधरा हजाराची लाच स्वीकारणारा पोलीस हवालदार एसीबी च्या जाळ्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन, धरणगाव।
तालुक्यातील पाळधी येथील पोलिस कॉन्स्टेबलला आज जळगाव एसीबीच्या पथकाने १५ हजारांची लाच स्वीकारताना अटक केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील पाळधी येथील पोलीस कान्स्टेबल सुमित पाटील यांनी 29 डिसेंबर रोजी एका अपघातग्रस्त वाहन सोडण्याससह अपघाताच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला मदत करण्यासाठी १५ हजार रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली होती. यातील तक्रारदाराच्या चालकाकडून काही दिवसांपूर्वी अपघात होऊन एका जणांचा मृत्यू झाला होता यासंदर्भात गुन्हा नोंद करण्यांत आल्याने वाहन जप्त झाले होते. हे वाहन सोडण्यासह संशयित आरोपीला मदत करण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल पाटील यांनी १५ हजार रुपयाची लाचेची मागणी केली असल्याने त्यानुसार आज लाचेची रक्कम देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर एसीबीचे पोलीस उपअधिक्षक गोपाळ ठाकूर यांच्या पथकाने आज सापळा रचत संशयित आरोपी पोलिस कर्मचारी सुमित पाटील यांना पंधरा हजार रुपयांची रोकड घेताना रंगेहात पकडले आहे.