भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

जळगाव , मंडे टू मंडे वृत्तसेवा : सदनिका खरेदी प्रकरणी ना हरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात ४ हजारांची लाच मागणी करणार्‍या जळगाव जिल्हा निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास जळगाव एसीबीच्या पथकाने आज बुधवारी रंगेहात अटक केल्याने सहकारातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, निमखेडी शिवारात असलेली एका सहकारी संस्थेमधील सदनिका खरेदी करणार असल्याने खरेदीकामी तक्रारदार यांना उपनिबंधक कार्यालयाकडून ना हरकत दाखला मिळण्यासाठी त्यांनी जळगाव जिल्हा निंबधक कार्यालयात ना हरकत दाखला देण्यासाठी कनिष्ठ लिपीक विनोद रमेश सोनवणे (46, रा.रीधुर वाडा, शनीपेठ, जळगाव) यांनी तक्रारदारास ५ हजार रुपयांची मागणी केली होती. यात तडजोडीअंती ४ हजार रूपये देण्याचे ठरले मात्र, एसीबीकडे तक्रार झाल्याने त्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली. लाचखोर विनोद सोनवणे याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!