भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावपाचोरा

७९ हजारांची लाच मागणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यास जळगाव एसीबी ने केली अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सोलर फिटिंग चे तीन ऑनलाइन प्रकरणे सबमिट केले होते . आधी २८ प्रकरणे रिलीज ऑर्डर काढली. यांचे एकूण ७९ हजार रुपयांची लाच पाचोरा महावितरण चे अभियंता मनोज मोरे यांनी मागितली होती. या प्रकरणी २९ हजारांची लाच घेताना मनोज मोरे यांना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले.

तक्रारदार यांचा सोलर फिटिंग चा व्यवसाय आहे. त्यांनी एकूण 3 प्रकरणे तयार करून online द्वारे सबमिट केले होते. सदर तीन ही प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून देण्यासाठी ३००० प्रमाणे एकूण ९००० व यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढून दिली आहे त्याची लाच मागत असल्याने तक्रारदार यांनी दिनांक ११/०८/२०२५ रोजी लाप्रवी जळगाव येथे तक्रार दिली होती. पडताळणी दरम्यान मनोज मोरे

यांनी तीन प्रकरणांचे रेग्युलर प्रमाणे ९००० ची मागणी केली तसेच यापूर्वी एकूण २८ प्रकरणांची रिलीज ऑर्डर काढली आहे त्याचे तुम्ही वन टाइम पेमेंट करत आहात म्हणून २५०० प्रमाणे ७०००० रुपये होतात त्यापैकी तुम्ही ३०००० दिले आहेत उर्वरित ४०००० पैकी पहिल्या हप्त्याचे आज २०००० व चालूच्या ३ प्रकरणांचे ९००० अशी एकूण २९००० ची मागणी करून २९००० रुपये स्वकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दिनांक १२ ऑगस्ट रोजी पाचोरा महावितरण अभियंता मनोज मोरे . यांच्या कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन केले असता मनोज जगन्नाथ मोरे , वय -38, पद- सहा. अभियंता,म. रा. वि. वि. पाचोरा 2उपविभाग खाते – महावितरण रा.अभियंता नगर,संभाजी चौकाच्या जवळ, पाचोरा, जि. जळगाव. ( वर्ग-२ ) यांनी स्वत: लाचेची रक्कम स्वीकारली आहे म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे विरुध्दभ्र.प्रति.अधि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर,
पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग.जळगाव. स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक,ला. प्र. वि. जळगाव. पो.कॉ.राकेश दुसाने,अमोल सूर्यवंशी,प्रणेश ठाकूर,चालक सुरेश पाटील,सर्व नेमणूक ला.प्र.वि. जळगाव युनिट. यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!