तीन हजारांची लाच मागितली, तलाठी व पंटर वर जळगाव एसीबी ची कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l वडिलोपार्जित शेत जमिनीवरील बहिणीचे हक्कासोड पत्राची नोंद करण्यासाठी सात बारा उतारे देण्याच्या मोबदल्यात तीन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलठ्या सह पंटर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील भडगांव येथे घडली.
तक्रारदार हा ४९ वर्षीय पुरुष असून तो रा. कोळगांव ता. भडगांव जि. जळगांव येथील रहिवाशी आहे. यांची भडगांव तालुक्यातील सावदे शिवारातील वडिलोपार्जित शेत जमीन आहे . सदर जमीन वरून तकारदार यांचे बहिणीचे हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी व ७/१२ उत्तारे देण्याच्या मोबदल्यात तलाठी विलास शेळके व त्यांचा पंटर धीरज यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम ४ हजार, लाचेची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून भडगांव पोलीस स्टेशन मध्ये विलास बाबुराव शेळके , व्यवसाय – नोकरी, तलाठी सजा प्रिंपीहाट ता.भडगांव. व पंटर धिरज पुर्ण नाव माहित नाही ( खाजगी इसम मदतनीस ) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सापळा व तपास अधिकारी योगेश ठाकूर पोलीस उप अधीक्षक. लाप्रवि जळगांव. सापळा पथक
Psi दिनेशसिंग पाटील, मपोहेकॉ शैला धनगर, पोकॉ राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी यांनी केली