जळगाव कथित ‘रेस्ट हाऊस अत्याचार’ प्रकरण चर्चेचा विषय !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील एका विश्रामगृहात एका तरुणीवर राजकीय पक्षाची संबंधित पदाधिकारी असलेल्या काहींनी मिळून एका मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेची चर्चा दिवसभर सकाळ पासून आगीसारखी पसरल्यानंतर एकच चर्चा रंगली हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची समजले.
मंडे टू मंडे न्युजला याबाबत काहींनी विचारणा केली असता याप्रकरणाचा अधिक शोध घेतला समजले की, जळगावातील एका रेस्ट हाऊसमध्ये शनिवारी एका तरुणीवर काही जणांनी अत्याचार केल्याची चर्चा होती. याप्रकरणात राजकीय पक्षाचा मोठा पदाधिकारी असल्याचे बोलले जात असून पीडित तरुणी त्यांच्याशी संबंधित असून तरुणीवर जळगावातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समजले. याबाबत अधिक कानोसा घेतला असता संशयीत आरोपी दिग्गज असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे समजते. मात्र, ठोस कुणी समोर आलेली नाही.
तसेच कुठे तरी पाणी मुरत असल्याची जोरदार चर्चा असून मात्र ठोसपणे पुढे येण्यास कोणी तयार नसून तरुणीला गोपनीय पद्धतीने पुण्यात उपचारार्थ हलवण्यात आल्याचे माहिती मिळाली. सदरील प्रकरणाचा मीडिया कसून शोध घेत असून परंतु याबाबत अधिकृत कुठलीही माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये. सत्य काय हे समोर येईस्तोवर ही फक्त चर्चा आहे असे म्हणावे लागेल.