जळगाव जिल्ह्या उद्यापासून अनलॉक, काय सुरु काय बंद?
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव, प्रतिनिधी: राज्य सरकारने पाच टप्प्यात अनलॉकची घोषणा केली होती त्यानुसार आता जिल्हा प्रशासनाकडूनही अनलॉकबाबतची नियमावली जारी करण्यात आली असून उद्या पासून बर्याच प्रमाणात निर्बंधामध्ये शिथीलता देण्यात आली असून काही निर्बंध मात्र, कायम ठेवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबत निर्देश जारी केले आहे.
- जिल्ह्यात निर्बंध खालील प्रमाणे शिथिल करत अनलॉक करण्यात येणार आहे–
- १) सर्व अत्यावश्यक सेवेची आणि इतर दुकाने : जिल्ह्यातील सर्व दुकाने ही नियमितपणे रात्री नऊ वाजेपर्यंत उघडी राहतील. मात्र यासाठी सॅनिटायझेशनसह अन्य नियमांचे पालन करावे लागले. दुकानात एका वेळी ५ पेक्षा ग्राहक नसावेत याची काळजी घ्यावी लागेल. दुकानाच्या दर्शन भागामध्ये बँकेप्रमाणे काऊंटर लाऊन काच अथवा प्लास्टीकची पारदर्शक शीट लावावी लागणार आहे. यात फक्त विक्री होणारी वस्तूच जाऊ शकेल इतका भाग खुला ठेवावा लागेल. तर दुकानाच्या आता फेस शील्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
- २) शॉपींग मॉल, मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन सिनेमागृहे ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील.
- ३) हॉटेल, उपहारगृहे आदी : सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत ५० टक्के क्षमतेसह खुली राहतील
- ४) मैदाने, जॉगींग ट्रॅक, सार्वजनीक ठिकाणे, सायकलींग पूर्ववत सुरू करण्यात येतील.
- ५) सर्व खासगी कार्यालये पूर्ववत पूर्ण वेळ खुली राहतील.
- ६) शासकीय कार्यालये : पूर्ण क्षमतेने खुली राहतील
- ७) क्रीडा/शुटींग आदी : आधीप्रमाणे नियमित राहतील. मात्र ५० टक्के क्षमता असावी.
- ८) सामाजिक, सांस्कृतीक व मनोरंजनपर कार्यक्रम : दोन तासांच्या आत कार्यक्रम उरकावा लागेल. फक्त १०० लोकांची उपस्थितीला मान्यता.
- ९) विवाह व अंत्यंस्कार : फक्त ५० जणांना परवानगी.
- १०) निवडणुका : सर्व निवडणुकांच्या प्रक्रियेला परवानगी
- ११) कृषी संबंधीत दुकाने व कामे : पूर्ववत परवानगी
- १२) बांधकामास कोणतेही निर्बंध नाहीत
- १३) जीम/सलून/ब्युटी पार्लर आदी ५० टक्के क्षमतेसह सुरू राहतील.
- १४) सार्वजनीक वाहतूक पुर्णपणे सुरू
- १५) माल वाहतूक पुर्ववत सुरू राहणार
- १६) आंतर जिल्हा प्रवास परवानगी मात्र, जिथे संसर्ग आहे त्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी ई-पास आवश्यक राहील.
- १७) उद्योग पूर्ण क्षमतेचे पुर्ववत खुले राहणार
- १८) सार्वजनीक ठिकाणी वावरण्यास कोणतीही बंदी नाही.