चिंता कायम ; जळगाव जिल्ह्यात आज ३३८ रुग्ण कोरोना बाधित
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव जिल्हा कोवीड रुग्णालयाने दिलेल्या अहवालात आज दिवसभरात ३३८ कोरोना बाधित नव्याने आढळून आले आहे, तर ४०९ जण कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जळगाव शहर-५५,जळगाव ग्रामीण -१२, भुसावळ त-३०, अमळनेर-११, चोपडा-२४, पाचोरा-०, भडगाव-३१, धरणगाव-७,यावल-२२, एरंडोल -१५, जामनेर-१, रावेर-७, पारोळा-२६, चाळीसगाव-६७, मुक्ताईनगर-११, बोदवड-९ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकूण ३३८ रुग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४९ हजार ३३४ कोरोना बाधित आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४३ हजार १९१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार ५६२ कोरोना रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ हजार ५८४ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.