कामगार नेते प्रल्हाद सोनवणे यांची आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव.मंडे टू मंडे वृत्तसेवा। नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष , ऑटो रिक्षा चालक मालक संघटना कृति समिति महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष , भगवे वादळ महाराष्ट्र चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा आदिवासी संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष कामगार नेते प्रल्हाद भाऊ सोनवणे जळगाव यांची आदिवासी कोळी महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी आदिवासी कोळी महासंघ , आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री डॉ दशरथजी भांडे यांनी नियुक्ती केली.आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिकी यांचा आदर्श घेऊन महात्मा फुले, छत्रपती शाहू राजे , भारत रत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणवादी भूमिकेमुळेच व घटनात्मक तरतुदी मुळे आदिवासी कोळी महासंघ व आदिवासी समूहाचा विकास होईल व समाजावर गाढ श्रद्धा असल्यामुळे प्रल्हाद सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांच्या नियुक्तीचे माजी मंत्री डॉ दशरथ जी भांडे साहेब,जळगांव जिल्हा परिषद सदस्य मा. प्रभाकर आप्पा सोनवणे , अमरावती विभागीय अध्यक्ष मा. भास्करराव कोलटेके,अकोला जिल्हा अध्यक्ष मा. प्रशांत भाऊ तराळे,अमरावती विभागीय अध्यक्ष.एकनाथ दादा जोहार,विभागीय कार्याध्यक्ष डॉ. दादासाहेब कोळी आदिवासी नेते उन्हाळे दादा गुरुजी कार्याध्यक्ष मनोहरराव बुध आदिवासी संघर्ष समिती,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भैय्यासाहेब जाधव,नासिक जिल्हा अध्यक्ष गरुड साहेब धुळे जिल्हा अध्यक्ष भूषण भाऊ ठाकरे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष आनंद भाऊ कोळी,जळगाव पूर्व जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ कांडेलकर जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ बाविस्कर मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष संजय भाऊ कांडेलकर वढोदा सरपंच संजय भाऊ सोनवणे,पश्चिम जिल्हाध्यक्ष कर्मचारी विभाग मंगल भाऊ कांडेलकर महिला जिल्हाध्यक्ष सौ.सूनिताताई कोळी जळगांव पूर्व जिल्हाध्यक्ष कर्मचारी विभाग जगदीश सोनवणे, समाधान दादा मोरे चोपडा तालुका अध्यक्ष भरत भाऊ बाविस्कर उपाध्यक्ष विशाल कोळी एरंडोल तालुका कर्मचारी अध्यक्ष अभिमन कोळी जळगाव तालुका उपाध्यक्ष अशोक सपकाळे,एरंडोल तालुका अध्यक्ष,अमळनेर तालुका अध्यक्ष तसेच सर्व आदिवासी कोळी समाज बांधव व पदाधिकारी. कार्यकर्ते नी अभिनंदन केले आहे,
प्रल्हाद सोनवणे येत्या काळात उत्तर महाराष्ट्र विभाग जळगाव जिल्हा तील विविध अन्याय ग्रस्त आदिवासी समाजावर सातत्याने अन्याय होत असून या विरोधात माजी मंत्री डॉ दशरथ जी भांडे साहेब यांच्या प्रमुख मार्गर्शनाने व त्यांच्या नेतृत्वात शासन दरबारी
रस्ता वरील लढाई , न्यायालयीन लढाई च्या माध्यमातून राज्यभर समाजाविषयी जन जागृती करून आपल्या कार्य क्षेत्रातील सर्व नियुक्त्या उदा . युवक आघाडी , महिला आघाडी , कर्मचारी आघाडी , विद्यार्थी आघाडी इ. वर कार्यालयाचे पूर्व संमतीने नियुक्ती करिता शिफारस करतील व संघटनेला बळ देण्यासाठी संपुर्ण शक्ती निशी प्रयत्न करतील तसेच शासनाचा अधि पदाचा काळा कायदा रद्द व्हावा , सर्व आदिवासी समाज बांधवांना एस टी जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील