भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

ऑटोरिक्षात पारदर्शक पडद्याने विभाजन करा,अन्यथा कारवाई

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व प्रसार पूर्णपणे रोखणे अत्यावश्यक आहे. याकरीता जिल्हा प्रशासन यांचेकडून विविध मोहिमा व बंधने घालण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व ऑटोरिक्षा चालकांनी ऑटोरिक्षांमधील प्रवासी व चालक यांच्यात संपर्क होवू नये, याकरीता त्यांचे ऑटोरिक्षांमध्ये चालक केबीन व प्रवाशांना बसण्याची जागा या दरम्यान फायबर/प्लास्टीकचे अथवा इतर पारदर्शक पडद्याने विभाजन करावे जेणेकरुन होणारा संसर्ग टाळता येईल.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेकरीता ऑटोरिक्षामधून कमाल 2 प्रवासी वाहतूकीची परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर परिणामकारकरित्या प्रभावी पध्दतीने आळा घालण्याकरीता या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी सर्व ऑटोरिक्षा चालकांची तसेच प्रवाशांची सुध्दा आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्याम लोही,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे की,जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा चालकांनी याप्रमाणे त्यांच्या ऑटोरिक्षामध्ये सुधारणा करुनच प्रवासी वाहतूक करावी. जे ऑटोरिक्षाधारक या सुचनांचे पालन करणार नाहीत, अशा ऑटोरिक्षा चालकांविरुध्द 16 मे, 2021 पासून मोटार वाहन कायदा 1988, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता अधिनियमातंर्गत कारवाई करण्यात येईल, याची सर्व ऑटोरिक्षाचालकांनी नोंद घ्यावी.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!