भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावशैक्षणिक

बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ऑनलाइनच

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसंकलन। कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या धास्तीमुळे राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. या पार्श्‍वभूमिवर विद्यापीठांतर्गत २१ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या हिवाळी परीक्षा ऑनलाइनच घेण्याचा निर्णय गुरूवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती परीक्षा नियंत्रक प्रा.डॉ.के.एफ.पवार यांनी दिली.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ऑनलाईन या पध्दतीत होणार असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. के. एफ. पवार यांनी दिली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन हे होते. प्र-कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार उपस्थित होते.

विद्यापीठाच्या अंतर्गत हिवाळी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ही ऑनलाइन पध्दतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपात स्मार्टफोन, लॅपटॉप आदींद्वारे घेण्याचे ठरले. तसेच विद्यापीठस्तरीय प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षांचे आयोजन हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरित्या न बोलवता स्काइप किंवा इतर ऑनलाइनमाध्यद्वारे घेण्याच्या सूचना विद्यापीठाकडून करण्यात आल्या आहे. याशिवाय पदवीस्तरावरील एकूण ६० गुणांच्या परीक्षोसाठी ९० मिनिटांचा कालावधी असेल. पदव्युत्तरस्तरावरील एकूण ६० गुणांच्या परीक्षेसाठी १२० मिनिटांचा कालावधी असणार आहे. यासह ज्या विद्यार्थी कडे लॅपटॉप, संगणक वा स्मार्टफोन आदी सुविधा नसतील त्यांना महाविद्यालयाने त्या उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!