जळगाव

जळगाव जिल्हा पत्रकार संघात २० फेब्रुवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर जयंतीचे आयोजन,उपस्थितीचे आवाहन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। महाराष्ट्र शासनाने अलीकडेच जाहीर केल्यानुसार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनानुसार पत्रमहर्षी स्व. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दि. ६ जानेवारी ऐवजी २० फेब्रुवारी या दिवशी साजरी करण्याचा निर्णय झाला आहे.

जळगाव जिल्हा पत्रकार संघ वरील सुचनेनुसार स्व. बाळशास्त्री जांभेकर जयंती येत्या रविवार, दि. २०/०२/२२ रोजी पत्रकार भवन येथे साजरी करणार असून त्यानिमित्ताने पत्रकारांसाठी स्व. बाळशास्त्री जांभेकर प्रबोधन वर्ष म्हणून साजरे करणार आहे .स्व. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्त दि २०/०२/२२ वार रविवार रोजी ,जळगाव जिल्हा पत्रकार संघात हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे .या प्रसंगी २०२२-२४ पत्रकार संघ कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. या वर्षभरात पत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडियातील पत्रकार आणि वेब मीडिया, सोशल मीडियातील पत्रकार अशा सर्वांसाठी प्रबोधन कार्यशाळा आयोजित करणार आहे. जिल्ह्यातील तालुका पत्रकार संघ अध्यक्ष यांना स्व. बाळशास्त्री जांभेकर प्रतिमा (फोटो) देण्यात येणार आहे .या उपक्रमासाठी सर्व पत्रकार आणि संबंधितांनी भाग घ्यावा आणि मान्यवर ज्येष्ठ पत्रकार / संपादकांचे अनुभव त्यांचे मार्गदर्शन याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!