भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Uncategorized

भरारी फाऊंडेशनचे कोविड केअर सेंटर 3 रुग्ण यशस्वीरित्या बरे होऊन आपल्या घरी परतले !

जळगाव (भुषण जाधव)। भरारी फाउंडेशनच्या तज्ञ डॉक्टर्स, सेवाभावी स्वयंसेवक यांच्या सच्छिल सेवेमुळे काल 15 वर्षाचा बालक, 32 व 45 वयाच्या महिला यशस्वी उपचार घेऊन पूर्णपणे बऱ्या होऊन आपल्या घरी परतले. त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारून फुलांच्या वर्षावात त्यांना निरोप देण्यात आला.

त्यावेळी डॉ.केतन पाटील, डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.लक्ष्मणसिह राजपूत, वैशालीताई पाटील, वैशालिताई विसपुते, गोविंदा लोहार, भरारी फाउंडेशनचे विनोद ढगे, सचिन महाजन, आकाश धनगर, दीपक परदेशी, देवराज बोरसे उपस्थित होते. भरारी फाऊंडेशन या बहुउद्देशीय संस्थेने छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे 50 खाटांचे सी सी ई सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी रुग्णांची घरासारखी पण पूर्णतः वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेणे सुरू आहे. आरोग्यसोबतच त्यांच्या मनालाही उभारी मिळावी यासाठी अनेक मोटिवेशनल स्पीकर्स तसेच मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर या सेंटरला भेट देऊन जात असतात. नाट्य समीक्षक व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील, आणि मोटिवेशनल स्पीकर रामचंद्र पाटील, जयदीप पाटील, यांनी भेट देऊन रुग्णांचे स्वतंत्र सेशन घेतले. योग शिक्षक डॉ.अनंत महाजन हे रोज सकाळी 8 ते 8:30 या कालावधीत रुग्णांचा अर्धा तास योग वर्ग घेऊन त्यांची प्रतिकारक्षमता वाढवीत आहेत.

रोज विविध विषयांवरचे वक्ते व भरारी फाउंडेशनचे पालक रजनिकांत कोठारी, केशवस्मुर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, जैन उदयोग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, अनिष शहा, नंदू आडवाणी, अनिलजी भोकरे , डॉ.राजेश पाटील , सपन झुनझुनवाला, सुशील नवाल, सुनील झंवर, आदेश ललवाणी, अनिल कांकरिया, सभापती सुचिताताई हाडा,रवींद्रजी लढा, नरेशजी खंडेलवाल, अमरसेठ कुकरेजा, डॉ.राधेश्याम चौधरी व अजिंक्य देसाई हे मान्यवर आपले अनमोल मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत. भरारी फाउंडेशनचे कार्यकर्ते यासाठी खूप परिश्रम घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!