भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावभुसावळराजकीय

राजीनामे देऊन पक्षाला वेठीस धरू नका : अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे फ्रंटल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम सत्रावर खडसावत पक्ष कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठा असतो, त्या मुळे पक्ष आदेश देईल तो मनलाच पाहिजे. उगाच राजीनामे देवून पेपर बाजी करून पक्षाला वेठीस धरू नका, अशी तंबी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.

जळगाव महानगर अध्यक्ष याना पदावरून दूर केल्यानंतर काही सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावर आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार धुसफूस व पक्षांतर्गत कुरघोड्या रंगत आहे. गेल्या काही दिवसापासून हा वाद सुरू आहे. पवार यांनी या प्रकरणी कार्यकर्त्यांना चांगली तंबीच दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या भुसावळ विभागात विविध विकास कामांचा शुभारंभ ऑनलाईन पद्तीने अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कुणीही आपण कायमच अध्यक्ष रहाणार असे समजू नये. ज्या एखादया व्यक्तीला जबाबदारी दिली असेल. त्या व्यक्तीने आपल्यला ही जबाबदारी कधीतरी सोडायची आहे. याची खूणगाठ मनाशी बांधूनच पुढे गेले पाहिजे. हे मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचे आहे. म्हणूनच मी सांगतो पक्षापेक्षा कुणीही मोठा नसतो. लोक येत असतात लोक जात असतात, पक्ष आपल्या आपल्या परीने पुढे जात असतो. पक्षाचे अनेक पाठीराखे असतात ते पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेऊन काम करीत असतात, असेही पवार यांनी सांगितले. 

पवार म्हणाले, मी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत पक्ष कार्यालयात असतो. त्यावेळी मला समस्या सांगितल्या तर त्या सोडविता येतील. आता सद्या जळगावमध्ये पेपरबाजी जास्त चाललेली आहे. वास्तविक पक्षांतर्गत जे प्रश्न असतात त्यात पेपर बाजी करून काहीच साध्य होत नाही. माझी या कार्यक्रमा निमित्ताने सूचना आहे. विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा परिवार आहे. घरातला पक्ष आहे, त्यामुळे राजीनामा देणे, पक्षाला वेठीस धरणे हा प्रकार करू नका. पक्ष हा कोणाकरिता थांबत नाही. पक्षापेक्षा कोणीही मोठा नसतो. आज अजित पवार उपमुख्यमंत्री असला तरी तो पक्षामुळेच आहे. याची जाणीव अजित पवार यांच्यासह सर्वांनी ठेवली पाहिजे. पक्षाच्या सूचना मान्य केल्या पाहिजेत. कोणीही ताम्रपट घेवून जन्माला आलेला नाही, असे पवार यांनी सांगितले. महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला. याचे तीव्र पडसाद जळगावात उमटले. अभिषेक पाटील यांच्यानंतर वेगवेगळ्या 12 फ्रंटल अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले आहेत. पक्षाने पाटील यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करायचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, म्हणून प्रदेशकडून सूचित केले होते. याप्रकरणात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना फाईलावर घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!