भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावभुसावळ

२४० रुपयांची लाच भोवली; तलाठ्यांसह कोतवालांस अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

भुसावळ (प्रतिनिधी)। तालुक्यातील कु-हे पानाचे येथील तलाठयाला सातबारा उताऱ्यावरील बोजा कमीकरून देण्याच्या मोबदल्यात लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

आज सोमवार ८ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सातबारा उताऱ्यावरील बोजा कमीकरून देण्याच्या मोबदल्यात फक्त २४० रुपयांची लाच घेतांना तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील तलाठी प्रवीण मेश्राम व कोतवाल प्रकाश अहिर या दोघांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधित विभागाच्या पथकाने अटक केली आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपाधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्यासह पथकाने हि कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!