भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

वरणगाव शहराजवळ ४ लाखाचा अवैध गुटखा एलसीबी कडून जप्त

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

वरणगाव ता.भुसावळ (प्रतिनिधी)। मध्यप्रदेशातून येणारा तब्बल चार लाख रूपयांचा गुटका एलसीबीच्या पथकाने वरणगाव शहराजवळ जप्त करून दोन आरोपींना अटक केली.

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्यात पूर्णपणे गुटखा बंदी असताना जवळच्याच मध्य प्रदेशातून पुरनाड मार्गे मोठ्या प्रमाणावर गुटखा तसेच तंबाखुजन्य पदार्थाची छुप्या मार्गाने वरणगाव व परिसरात तसेच संपूर्ण जळगाव जिल्यात आयात केली जाऊन त्याची चढ्या भावाने विक्री केली जात आहे.

वरणगांव हे गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र
वरणगांव हे गुटखा विक्रीचे मुख्य केंद्रच बनले असता मध्य प्रदेशातून चार चाकी क्रमांक एमएच १९ एपी- २११४ या कार मध्ये गुटखा येत असल्याची गुप्त माहीती जळगाव गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्याबरोबर हतनुर टहाकळी मार्गावर सापळा रचुन मध्य प्रदेशातून येणार्‍या गाडीची चौकशी करून तपासणी केली. यामध्ये त्यात सुमारे चार लाख रुपयाचा गोणीत भरलेला गुटखा आढळला असुन तो जप्त करण्यात आला आहे. आणि सर्व मुद्देमाल वरणगाव पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केला आहे. गुटखा घेऊन येणारी कार व संशयीत सुनिल माळी व विनोद चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,

अन्न व औषध प्रशासना वर प्रश्नचिन्ह ?
जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा विक्री सुरू असतांना अन्न व औषध प्रशासनातर्फे कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात असून करवाई का करत नाही ,अर्थपूर्ण सम्बधातून तर दुर्लक्ष करत नाही ना असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!