भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावयावलराजकीयरावेर

दगड उभा केला तरी कमळ निवडून येईल; रक्षा खडसेंच्या उमेदवारीला विरोधाचा व पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, व्हिडिओ व्हायरल

जळगाव, मंडे टू मंडे न्युज चंमु | लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रावेर लोकसभा मतदार संघातील विद्यामान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर भारतीय जनता पक्षात अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर उफाळून येत असून कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांसमोर उमेदवाराना खडेबोल सुनावत असल्याचे व्हिडिओ समोर आल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सूर कायम असल्याचे दिसून येत असून दगड उभा केला तरी कमळ निवडून येईल असे सदरील व्हायरल व्हिडिओ कार्यकर्ते बोलत आहे.

रावेर लोकसभा मतदार संघातील विद्यामान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या उमेदवारीवर भाजपमधील पदाधिकारी नाराज आहेत. यामुळेच भाजपचा काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा त्यांना विरोध आहे. जळगावात भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर रक्षा खडसे व पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच भाजपचे कार्यकर्ते रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे यांना खडेबोल सुनावत आहे. तुमच्या गाडीत ‘तुतारी’चे कार्यकर्ते नेहमी असतात असे सांगून हा कार्यकर्ता चांगलच संतापला आहे. एकनाथ खडसे यांचे नाव घेतात मात्र मंत्री गिरीश महाजन यांचे नाव का घेत नाही? असे पदाधिकाऱ्यांनी रक्षा खडसेंना विचारत असून तसेच रक्षा खडसे भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत आहेत. त्यांच्या गाडीत तुतारीची लोक असतात, भाजप कार्यकर्त्यांना डावलले जात आहे अशा आरोपांचा भडीमार भाजप कार्यकर्ते रक्षा खडसे यांच्यावर करताना व्हिडिओत दिसत आहेत.

तर “दगड जरी उभा केला तरी कमळ निवडून येईल” असे कार्यकर्ते मंत्री गिरीश महाजन यांना सांगत आहे. एकंदरीत खडसेंच्या उमेदवारीला विरोधात रोष दर्शवत दुसरा उमेदवार देण्याचे पदाधिकारी सांगत तर नाही ना ? मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर यासंदर्भात उघड नाराजी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. खुद्द मंत्री गिरीश महाजन त्याला शांत करीत असतांनाही त्याने सत्य परिस्थिती सर्वांसमोर सांगितल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे भाजपमध्ये खासदार रक्षा खडसे विरोधात अंतर्गत कलह पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी आमदार मंगेश चव्हाण, राजूमामा भोळे, स्मिता वाघ व्हिडिओमध्ये दिसत आहे. एकंदरीत रावेरच्या जागेवरुन उमेदवारां विरोधातील  भाजपात अंतर्गत धूसफुस मोठ्या प्रमाणावर असून ती शांत करण्यासाठी वरिष्ठांना मेहनत घ्यावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!