भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

बोदवळमुक्ताईनगरसामाजिक

शिरसाळा जागृत मारुती देवस्थानास ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा; आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश !

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि : बोदवड तालुक्यात असलेले तीर्थस्थळ (पर्यटनस्थळ) प्रसिद्ध जागृत मारुती जय श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, शिरसाळे या तीर्थक्षेत्रांस “ब” वर्ग दर्जा प्रदान करण्यात आला असून आ. चंद्रकांत पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले.

जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात मोडणाऱ्या बोदवड तालुक्यात असलेले धार्मिक देवस्थान व तीर्थस्थळ (पर्यटनस्थळ) जागृत मारुती शिरसाळा हे देवस्थान राज्यभरात प्रसिद्ध आहे. हे स्थळ सर्व जाती, धर्म व समाजातील लोकांकरिता श्रद्धा व आस्थेचे केंद्र आहे. या ठिकाणी दर शनिवारी लाखोच्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते. येथे देवस्थानचा दर्जा वाढ करून “ब”वर्गाचे देवस्थानाचा दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी जय श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, शिरसाळे ता. बोदवड जि. जळगांव या ट्रस्ट चे अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच विश्वस्त व गावकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कडे केली होती.

त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून मागणी लावून धरली होती. या मागणीला यश आलेले असून त्यानुसार, जय श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, शिरसाळे ता. बोदवड जि. जळगांव या तीर्थक्षेत्रांस “ब” वर्ग दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

“आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नामुळे आता शिरसाळा मारुती येथील देवस्थान व तीर्थस्थळाच्या पर्यटन दर्जेत वाढ करुण “ब” वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने तसेच सोबतच या तीर्थस्थळाचा सर्वांगीण विकास होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!