भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

Breaking : भाजपच्या बंडखोर नगरसेवकांपैकी ३ नगरसेवकांची घरवापसी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा। महापालिकेतील भाजपच्या बंडखोर नगरसेवकांच्या गटाला धक्का बसला असून तीन बंडखोर नगरसेवकांनी पुन्हा भाजपमध्ये घरवापसी केल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. माजी मंत्री महाजन आ.भोळे यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

याबाबत अधिक असे की, महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेने भाजपाची सुरुवातील २७ नगरसेवक फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर प्रभाग क्रमांक १० मधील ३ नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभा बारी, हसीनाबी शेख शरीफ यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश करीत बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या गळाला भाजपाचे ५७ पैकी ३० नगरसेवक लागले होते. त्यामाध्यमातून जळगाव महापालिकेवर शिवसेनेची सत्ता येत महापौर पदी जयश्री महाजन तर उपमहापौर पदी कुलभूषण पाटील यांची वर्णी लागली होती. मात्र आज माजी मंत्री गिरीश महाजन, आ. सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत २७ बंडखोर नगरसेवकांपैकी ३ नगरसेवकांनी आज भाजपमध्ये घर वापसी केली आहे. यात नगरसेवक सुरेश सोनवणे, शोभा बारी व हसिना बी. शेख यांचा समावेश आहे.

महत्त्वाचे म्हणजे हे तीनही नगरसेवक उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या प्रभागातील असल्याने त्यांना हा मोठा धक्का बसला आहे. कारण मनपाच्या  सत्तांतरात उपमहापौर कुलभूषण पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती.आगामी काळात महापालिकेतील स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीपूर्वीच बंडखोरांनी पुन्हा घरवापसी केल्याने भाजपच्या बंडखोर नगरसेवकांच्या गटत एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!