भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

बाल लैंगिक शोषण प्रकरणात जळगाव मध्येही CBIची छापेमारी

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : चाईल्ड पोर्नोग्राफी ऑनलाइन बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये सीबीआयच्या पथकाने देशभरात छापे टाकत कारवाई केली असून यात जळगावातही याप्रकरणी छापे मारण्यात आल्याचे CBI च्या प्रेस नोट मधून माहिती देण्यात आली आहे यामुळे या खळबळजनक प्रकाराचे धागेदोरे हे जळगावपर्यंत असल्याचे यातून समोर येत आहे. सीबीआयने केलेल्या या कारवाईत जळगाव, धुळे येथे छापे टाकल्याने जिल्हा पुन्हा रडारवर आला आहे.

जगभरात इंटरनेटवर वाढणारे बाल लैंगिक शोषण एक जागतिक समस्या बनत आहे. या समस्येमुळे खेळणारे, उड्या मारणारे बालपण हळूहळू नष्ट होताना दिसत आहे. भारतात लहान मुलांवरील गुन्हांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशाच गुन्ह्यांना रोखण्यासाठी सीबीआयने दोन वर्षांपूर्वी एका पथकाची स्थापना केली होती. जे देशभरात लहान मुलांवर होणाऱ्या ऑनलाईन लैंगिक शोषण थांबवेल. गेल्या काही वर्षांमध्ये देशात बाल लैंगिक शोषणासंदर्भात एका पाठोपाठ एक अशा भीषण घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे आता सीबीआय याला आळा घालण्यासाठी सक्रिय झाली आहे. या दरम्यान ऐतिहासिक कारवाई करत देशातील १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७७ ठिकाणी छापे टाकून ८३ आरोपींविरुद्ध २३ गुन्हे दाखल केले. छापेमारीत जळगाव, धुळेचा देखील समावेश असून सीबीआयला इलेक्ट्रॉनिक डिवाइस आढळून आले आहेत. यातील आरोपींचे धागेदोरे हे १०० देशांची जुळले असण्याची शक्यता आहे. चौकशीत आतापर्यंत ५० हून अधिक ग्रुप आढळून आले आहेत.

सीबीआयने मंगळवारी केलेल्या छापेमारीत ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या चौकशीत ठोस पुरावे आढळून आल्यावर त्यांना अटकही केली जाणार आहे. दरम्यान, सीबीआय या प्रकरणी विदेशी नागरिकांची धरपकड आणि त्यांच्या सामील होण्याबाबत इंटरपोलद्वारे संबंधित देशांशी लवकरच संपर्क करणार आहे. सीबीआयकडून अशा प्रकरणात पहिल्यांदाच ऐतिहासिक कारवाई करण्यात आली असून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. सीबीआयने या प्रकरणी एक विशेष टीम बनवली आहे. अशा प्रकरणांवर ही टीम नरज ठेवून आहे. अशा प्रकरणांचा खोलात जावून तपास सुरू आहे. असे जवळपास ५० हून अधिक ग्रुप आहेत. ५००० हून अधिक लोक त्यांच्याशी जुडलेले आहेत. त्यांचे संबंध १०० देशांशी आहेत. या प्रकरणांत ८० हून अधिक लोक सामील असल्याचं सीबीआयला तपासात आढळून आलं. हा ग्रुप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि थर्ट पार्टी होस्टिंग प्लॅटफॉर्मवर लिंक, व्हिडिओ, पोटो आणि पोस्टद्वारे बाल लैंगिक शोषणाचा प्रसार करत आहेत. छाप्यांदरम्यान अनेक इलेक्ट्रॉनिक डिवाइस, मोबाइल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!