Breaking : जिल्हा बँक अध्यक्षपदी गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर व उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांची वर्णी लागली असून आज झालेल्या बैठकीत नंतर त्यांनी अर्ज दाखल केले आहे.
जळगाव जिल्हा बँकेची निवडणूकीत सर्वपक्षीय पॅनलची चर्चा असतांना नाट्यमय घडामोडींनंतर शेवटच्या क्षणी भाजपचा गेम करत महाविकास आघाडीने पॅनल बनविण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपने सत्ताधारी आरोप करत भाजपच्या मातब्बर नेत्यांनी ऐन वेळेस निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे सांगत माघार घेतली. या सर्व नाट्यमय घडामोडीत नंतर निवडणुकीत राष्ट्रवादीला १०, शिवसेनेला ७, कॉंग्रेसला ३ तर भाजपला एक जागा मिळाल्या असून आज जिल्हा बँकेच्या चेअरमन व व्हाइस चेअरमन पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. त्या पूर्वी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत चेअरमन पदासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर तर व्हाइस चेअरमन पदासाठी शिवसेनेचे श्यामकांत सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
महाविकास आघाडीच्या बैठकीत पदाचा कार्यकाळ आणि पक्ष निश्चित झाले असले तरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार याचा सस्पेन्स मात्र कायम होता. शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर यांनी अध्यक्षपदासाठी तर शिवसेनेकडून शामकांत सोनवणे यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. दोघांची निवड निश्चित झाली असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे