भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

Breaking News : रावेर ब्राऊन शुगर प्रकरणात पुरवठा करणारा म्होरक्या गुन्हे शाखेच्या जाळ्यात !

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : रावेर शहरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत असलेले तब्बल अर्धा किलो हेरॉईन (ब्राऊन शुगर) जप्त केल्याची मोठी कारवाई करत काल रावेर येथून एका महिलेस एक कोटी रूपयांच्या ब्राऊन शुगरसह ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला देखील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जाळ्यात अडकला असून त्याला अटक केली आहे. यामुळे अंमली पदार्थांचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातमी क्लिक करून वाचा : Big Breaking : रावेरच्या कारवाईत १ कोटी रुपयांच्या ब्राऊन शुगर हेरॉईन जप्त, महिलेस अटक !

जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने रावेर पोलीस आणि महसूल खात्याच्या मदतीने काल रावेर येथे ब्राऊन शुगर तस्करणी प्रकरणात शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून अख्तरी बानो अब्दुल रऊफ (45, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्‍हाणपूर) या महिलेला अटक करण्यात आली होती तर तिच्याकडून एक कोटी आठ हजार रूपये मूल्य असणारे ५००.४ ग्रॅम हेरॉईनचे दोन कीट जप्त करण्यात आले होते. या महिलेची चौकशी केली असता तिने हा माल मध्यप्रदेशातील मंदसौर येथील सलीम खान शेर बहादूर याचा असल्याचे सांगितले होते. या महिलेच्या जबाबावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. एलसीबीचे एक पथक तातडीने मध्यप्रदेशात रवाना झाले. या महिलेला ब्राऊन शुगरचा पुरवठा करणारा मध्यप्रदेशातील संशयीत सलीम खान शेर बहादुर खान (किटीयानी कॉलनी, मनसौर, मध्यप्रदेश) याच्याही पथकाने शनिवारी रात्री उशिरा मुसक्या आवळल्याने मोठी कारवाई केली आहे.

या पथकाने रात्री उशीरा सलीम खान शेर बहादूर याला अटक केली आहे. यामुळे आता ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात आला असून परिणामी यातील रॅकेट उघड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता असून यातून जिल्ह्यात यापूर्वी ब्राऊन शुगरची झालेली वाहतूक तसेच खरेदी-विक्री करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या आरोपीला घेऊन पोलिसांचे पथक आज पहाटे आले असून त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या सहकार्‍याने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!