जिल्हा लेखा परिक्षक अधिकारी लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात !
जळगाव (विशेष प्रतिनिधी)। जिल्हाउपनिबंधक कार्यालयातील जिल्हा लेखा परिक्षक अधिकारी यांनी पथसंस्थेकडून ऑडीटसाठी ३२ हजार रूपयांची लाच घेतांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
सविस्तर माहिती अशी की, या प्रकरणात तक्रारदार जळगाव शहरातील असून त्यांनी तसेच इतर सहकारी यांनी जिल्ह्यातील विविध संस्थांचे ऑडिट पूर्ण करुन ते छाननीसाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ रावसाहेब बाजीराव जंगले (वय ५१) रा. जळगाव यांच्याकडे ररीतसर अर्ज सादर केले होते. जंगले यांनी या कामासाठी ३१ जुलै रोजी ५२ हजाराची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर नाशिकचे निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, म्रुदुला नाईक, हवालदार दीपक कुशारे, सचिन गोसावी, एकनाथ बाविस्कर व दाभोळे यांच्या पथकाने बुधवारी रात्री १० वाजता सापळा रचून ही कारवाई केली. जंगले यांना ॲडीट छाणणीसाठी मागीतलेल्या रकमेपैकी ३२ हजार रूपयांची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.