Breaking : आरटीओ एजंट लाच घेतांना एसीबी च्या जाळ्यात : लाचखोरांमध्ये खळबळ
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : आरटीओ अधिकार्यांच्या नावाने बस हस्तांतरित करण्याच्या बदल्यात वाहन मालकाकडून दहा हजारांची लाच स्विकारताना दोन खाजगी पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले असून सदरील खासगी एजंटावर करण्यात आलेल्या या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, खेडी बु. ता.जळगाव येथील एका तक्रारदाराने २३ नोव्हेंबर रोजी साधारण प्रवासी बस विकत घेतली असून सदरची बस तक्रारदार यांचे वडिलांचे नावावर हस्तांतर करण्याच्या मोबदल्यात आरोपी क्र. १ श्री.शुभम राजेंद्र चौधरी, वय-२३, व्यवसाय – आरटीओ एजंट, जळगाव खाजगी इसम, राहणार कोल्हे हिल्स, गॅस गोडाऊन जवळ, जिजाऊ नगर, जळगाव व आरोपी क्र. २ श्री.राम भिमराव पाटील, वय -३७, व्यवसाय – आरटीओ एजंट, जळगाव खाजगी इसम, राहणार अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ, जळगाव या दोघांनी RTO कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावे तक्रारदार यांचेकडे १० हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती मात्र, याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आल्याने एका एकोणीस वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारी वरून हा सापळा रचण्यात आला त्यानुसार सदर लाचेची रक्कम स्वत: शुभम चौधरी याने आरटीओ कार्यालय जळगाव आवारात पंचासमक्ष लाच स्वीकारतांना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात अडकला याप्रकरणी सदरील दोघ खासगी एजंट वरतीं गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई पोलीस उप अधीक्षक शशिकांत एस. पाटील, पो नि संजोग बच्छाव, स. फौ. दिनेशसिंग पाटील, स. फौ. सुरेश पाटील, पो. हे. कॉ. अशोक अहीरे, सुनिल पाटील, .रविंद्र घुगे, शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, सुनिल शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांनी ही कारवाई केली.