भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

गुरांची हत्या करून मांस बाळगणाऱ्या चौघांन विरुद्ध गुन्हा दाखल !

जळगांव (विशेष प्रतिनिधी)। प्राण्याची हत्या करून त्याचे मांस विक्री करणाऱ्या शहरातील अक्सानगर परिसरात इक्बाल कॉलनीत चौघांन विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काल ३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील अक्सानगर परिसरातील इक्बाल कॉलनीकडे जाणाऱ्‍या फुलाजवळील तैयबा मेडीकलच्या समोर असलेल्या पत्री शेड मध्ये शरीफ शेख उर्फ भोल्या रशीद शेख (वय 23 वर्षे), शेख आसीफ शेख रशीद (वय – 29 वर्षे), मोहम्मद इम्रान शेख रशीद शेख(वय -30 वर्षे), नाजीम शेख रशीद (वय – 28 वर्षे )सर्व रा.अक्सा नगर हे बेकायदेशीर व विनापरवाना गुरांची कत्तल करून मांस विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली होतो, त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील व इतर सहकारी यांच्या कार्यवाहीत कत्तल करत असल्याचे निदर्शनास आढळून आले, चारही जणांन विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, अक्सानगरातील नागरिकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात येवून ठिय्या मांडला होती. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक निलाभ रोहन यांनी नागरिकांची समजूत काढून शांत केले. यासाठी शेख फारुख शेख अब्दुल्ला, नगरसेवक रियाज बागवान, जिया बागवान, युसुफ शेख, जब्बार शेख कुरेशी अनिस शेख, सत्तार शेख, इमरान खान शेख, बाबुलाल कुरेशी, शेख सत्तार शेख गफूर अशांनी लोकांची समजूत काढण्यासाठी मदत केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!