बाल लैंगिक शोषण; सीबीआय ची जळगाव जिल्ह्यातील तरुणाला नोटीस
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। चाईल्ड पोर्नोग्राफी ( बाल लैंगिक शोषण ) प्रकरणी सीबीआयने देशभरात विविध ठिकाणी केलेले छापेमारीत चोपडा तालुक्यातील धानोरा येथील एका तरुणाला नोटीस बजावली असल्याचे कळतेय. तर दुसरीकडे शिरपूर जवळील ग्रामीण भागात राहणाऱ्या एक व्यक्ती देखील जाळ्यात अडकल्याचे कळतेय.
ऑनलाइन बाल लैंगिक शोषण सामग्रीशी संबंधित गुन्ह्यांवर देशव्यापी समन्वित कारवाईमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने १४.११.२०२१ रोजी ८३ आरोपींविरुद्ध ऑनलाइन बाल लैंगिक शोषण आणि शोषणाशी संबंधित आरोपांवर २३ स्वतंत्र प्रकरणे नोंदवली. यानंतर काल म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी देशभरात छापे टाकण्यात आले. यात जळगावातही छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयने आपल्या अधिकृत प्रेस नोटमध्ये दिली होती. परंतु सीबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरील एफआयआर सेक्शनमध्ये गुन्ह्याची एफआयार टाकण्यात आली आहे.
त्यानुसार धानोरा येथील दीपक नारायण पाटील मोबाईल क्रमांक (9834981952) तसेच राहुल भटा पावरा पोस्ट जोड्या, सांगवी, तालुका शिरपूर, जि. धुळे मोबाईल क्रमांक (9325784232) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात 120 ब आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या गुन्ह्यात या दोघांचा नेमका काय सहभाग आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. तर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक पाटीलचा मुलाला नोटीस बजाण्यात आल्याचे कळतेय. तो मुलगा अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असल्याचेही कळते. नोटीसनुसार तो नागपूरला चौकशीसाठी हजर होणार असून त्याने थोडी मुदत मागून घेतली, असल्याचेही कळतेय. यातील दीपक पाटील हे डिजिटल निरक्षर असल्याचेही कळते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल मोबाईलच्या संदर्भात चौकशी करण्यात येत असल्याचे कारण सांगून काही लोकांनी धानोऱ्यातून एकाची चौकशी करत नोटीस बजावली. नोटीस बजावणार लोकांनी नागपूर येथील गुप्तचर यंत्रणांकडून आले असल्याची बतावणी केली होती. एफआयआर नुसार तब्बल 31 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ठिकाणांवर छापेमारी
सीबीआयने १४ नोव्हेंबरला चाइल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी ८३ आरोपींविरोधात २३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले. याच प्रकरणी मंगळवारी सीबीआयने १४ राज्यांमधील ७७ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये दिल्लीमधील १९, उत्तर प्रदेशातील ११, आंध्र प्रदेशातील २, गुजरातमधील ३, पंजाबमधील ४, बिहारमधील २, हरियाणामधील ४, ओडिशामधील ३, तामिळनाडूमधील ५, राजस्थानमधील ४, महाराष्ट्रातील ३, छत्तीसगड, मध्ये प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येक एक जागेचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश – जालौन, मऊ, चंदौली, वाराणसी, गाझीपूर, सिद्धार्थनगर, मुरादाबाद, नोएडा, झांसी, गाझियाबाद, मुजफ्फरनगरमध्ये छापे
गुजरात – जुनागढ, भावनगर, जामनगरमध्ये छापे
पंजाब – संगरूर, मलेरकोटला, होशियारपूर, पतियाळा
बिहार – पाटणा, सिवान
हरयाणा – यमुनानगर, पानिपत, सिरसा, हिसार
ओडिशा – भद्रक, जाजपूर, ढेंनकनाल राजस्थान – अजमेर, झुंझुू, जयपूर, नागौर
मध्य प्रदेश – ग्वाल्हेर
महाराष्ट्र – जळगाव, धुळे, पालघर जिल्ह्यातील सलवड
हिमाचल प्रदेश – सोलन
आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि छत्तीसगडमध्येही सीबीआयने छापे टाकले.