भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडाजळगाव

जातपंचायतीची अजब शिक्षा, आमची थुंकी चाटणे अन् मुलीला मारून टाकावे.

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव(प्रतिनिधी)।आजच्या युगात जुन्या अन्यायकारक चालीरितींना तिलांजली दिली जातेय,नवीन नवीन कायदे निघत असताना एकविसाव्या शतकात सुद्दा काही समाजात जुन्याच अन्यायकारक चालीरितींचा वापर केला जात आहे ,जात पंचायतीच्या बाहेर जाऊन दुसऱ्यांदा विवाह केल्याच्या कारणावरून जात पंचायतीच्या पंचांनी महिलेला 1 लाख रुपये दंडासह,पंचांनी थंकलेली थुंकी चाटण्याची शिक्षा सुनावल्याची संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात चाहर्डी येथे घडली.

जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चाहर्डी येथील माहेर असलेल्या अर्चना बोडके या महिलेचा अकोला जिल्ह्यातील वडगाव येथील साईनाथ नागो बाबर यांच्यासोबत २०११ सालीच विवाह झाला. मात्र विवाह नंतर साईनाथ बाबर हा सदर महिलेला दारू पिऊन बेदम मारहाण करीत असल्याने अर्चना हिने न्यायालयात दाद मागून फारकत घेतली होती,परन्तु याचा राग येऊन जातपंचायत असताना न्यायालयात दाद मागून फारकत घेतल्याने संतप्त झालेल्या जातपंचायत सदस्यांनी जात पंचायत भरवून सदर महिलेला आणि तिच्या नातेवाईकांना जातीच्या बाहेर काढीत बहिष्कार घातला. व पुन्हा जातीत समावेश करायचा असेल तर १ लाख रुपये देण्यात यावे या शिवाय केळीच्या पानावर पंच थुंकतील ते चाटावे आणि डोक्यावर चपला घेऊन गाव भर फिरावे आणि दुसऱ्या पतीपासून झालेल्या मुलीला मारून टाकावे तरच जाती मध्ये समावेश केला जाईल, अशा प्रकारची शिक्षा सुनावली असल्याची माहिती अर्चना बोडके यांनी दिली आहे.

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीतर सदर महिलेने पोलिसात तक्रार देऊ नये, यासाठी अकोला येथील जात पंचायत सदस्य आपल्या कुटुंबावर मोठा दबाव आणत असून कुटुंबाचं बरे वाईट करण्याच्या धमक्या देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आपल्यावर या जात पंचायत सदस्यांनी खूप मोठा अन्याय आणि अत्याचार केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी अर्चना बोडके यांनी पोलिसांना केली आहे. नाथजोगी समाजात मुलाला दोन तीन विवाह करण्याची मुभा आहे. मात्र मुलीना पुन्हा विवाह करण्यास परवानगी नाही. त्यामुळे सदर घटनेत पीडित अर्चना यांनी जात पंचायतीला न विचारता न्यायालयात जाऊन दाद मागितली आणि दारुड्या नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन दुसरा विवाह केल्याचा राग धरून जात पंचायतीने गेल्या तीन वर्षांपासून आम्हाला जाती बाहेर काढले असून जातीमधील कोणत्याचं धार्मिक समारंभाला तसंच विवाह समारंभाला हजर राहू दिले जात नाही, आमच्या मुलांचे विवाह होऊ दिले जात नाही अशा प्रकारचा खूप त्रास दिला जात असून आमचं जगणं कठीण झालं, असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. महिलांना पुनर्विवाह करण्याची परवानगी मिळवून द्यावी अशी मागणी ही यावेळी नातेवाईक सुदाम बाबर यांनी केली आहे.

अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कायदे करण्यात आलेले असले तरी अशा प्रकारच्या घटना या समोर येत आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी जात पंचायती बरखास्त करण्यायाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कसोशीने प्रयत्न करीत आहेत, असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कत्यारे यांनी सांगितलं, ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, या संदर्भात सरकारने जात पंचायतीविरोधात कायदे केले असले तरी अशा प्रकारच्या घटना या समोर येत आहे,कायद्यानुसार, कोणत्याही जात पंचायतीला जात पंचायत भरवत अशा प्रकारची शिक्षा देण्याचा अधिकार नाही. या जात पंचायतीने दिलेली शिक्षा ही अतिशय घृणास्पद आहे. अशलाघ्य आणि मानवजातीला काळीमा फासणारी ही घटना आहे अशा प्रकारचा जात पंचायतीच्या निर्णय हा कायद्याला धरून नसल्याने समाजाने ही हे घ्यायला पाहिजे असं मतं महिला संघटना प्रतिनिधी वासंती दिघे यांनी म्हटलं आहे.दरम्यान, या घटनेच्या विरोधात चोपडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत जात पंचयतीच्या काही सदस्यांविरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस ठाण्यात तो वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!