भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडा

धक्कादायक; फिर्याददार भावानेच केला भावाचा खून

चोपडा (प्रतिनिधी)। येथील तालुक्यातील लासूर गावांत झालेल्या मारहाणीच्या घटनेत झालेल्या मृत्यु प्रकरणात फिर्यादार भावानेच भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी, रतिलाल जगन्नाथ माळी (३२)रा. लासुर यास ५ जानेवारी रोजी याने मध्यरात्रीच्या वेळी घरात प्रवेश केला म्हणून चारित्र्याचा संशय घेत त्याला घरात जावून लाथाबुक्यांसह लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत माळी यांचा मुत्यू झाला होता. या प्रकरणी मयताच्या भाऊ प्रदीप उर्फ आबा जगनाथ माळी (२८) रा. लासूर याच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात मंगेश नवल महाजन, विकास नवल महाजन, भूषण कैलास मगरे, दादु राजेंद्र साळुंखे (सर्व रा. लासुर) या चौघांचा समावेश होता. या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे. पोलीस तपासाअंती यातील फिर्यादीच आरोपी म्हणून समोर आला आहे. फिर्यादी प्रदीप माळी याचा भाऊ रतीलाल याने यापुर्वी देखील महिलांची छेडखानी केली होती. त्यामुळे त्याचे लग्न जमण्यात अडचणी येत होत्या. त्याची गावात बदनामी झाली होती. या रागातून प्रदिप माळी याने भाऊ रतीलाल माळी याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या जवाबातून हा प्रकार पुढे आला. त्यामुळे भाऊ रतीलाल माळी याचा खून करणारा प्रदिप माळी यास 9 जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे स.पो.नि. संदिप आराक करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!