आक्षेपार्ह स्टेटसच्या कारणावरून दोन गटात हाणामारी व दगडफेक !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शिरसोली गावात एका तरुणाने सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसवरून दोन गटात वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत आणि नंतर दगडफेक झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीत एक तरुण जखमी झाला असून पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिरसोली गावात आक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटसच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला यात काही तरुणांनी मध्यस्थी करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र, काही तरुणांनी दगडफेक केल्याने काही जण जखमी झाल्याचे समजत असून यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. पोलीस लागलीच घटनास्थळी पोहोचले यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
घटनास्थळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व त्यांचे सहकारी पोहचले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास व गुन्हा दाखल करण्याचे काम एमआयडीसी पोलीस करीत आहे.