पोलीस अधिक्षक कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ ; दोघांना अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। काल संध्याकाळी मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा करून जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात गोंधळ घातल्याने दोघांना अटक करण्यात आली.
या बाबत अधिक माहिती अशी की,सिंधी कॉलनी येथील राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी जितेंद्र अरुण चांगरे ,वय ४५, व कुसुंबा येथील निखिल राजू सोनवणे,वय २२, हे दोघे सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत पोलिस अधीक्षक कार्यालयात गेले असता तेथे त्यांनी आरडाओरड करून गोंधळ घातल्याने सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. त्यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांनी मद्यपान केल्याचे तपासणीत आढळून आल्याने दोघांविरुद्ध आरडाओरड करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.