जळगाव जिल्ह्यात आज ८३८ कोरोना बाधित,सर्वात जास्त रुग्ण चोपडा,चाळीसगाव,जळगाव शहर,
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८३८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ७५२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १०६, जळगाव ग्रामीण-२१, भुसावळ- ६८, अमळनेर-०७, चोपडा-१३६, पाचोरा-५८, भडगाव-०४, धरणगाव-१६, यावल-२८, एरंडोल-५५, जामनेर-३५, रावेर-३१, पारोळा-१८, चाळीसगाव-११८, मुक्ताईनगर-८७, बोदवड-३७, इतर जिल्ह्यातील-१३ असे एकुण ८७७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १२९ हजार ८८७ पर्यंत पोहचली असून ११७ हजार ७४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २३३७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ९८०४ रुग्ण सध्या उपचार घेताय.