दिलासादायक;जळगाव जिल्ह्यात आज ४८ रुग्ण कोरोना बाधित,
Monday To Monday NewsNetwork।
जळगाव (प्रतिनिधी)। आज दिवसभरात ४८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ११७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. विशेष म्हणजे आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचे जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात दिसते.
तालुका निहाय आजची आकडेवारी
जळगाव शहर-५, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१, अमळनेर-३, चोपडा-२, पाचोरा-२, भडगाव-२, धरणगाव-३, यावल-३, जामनेर-८, रावेर-४, पारोळा-३, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर-१, बोदवड-० असे एकुण ४८ रूग्ण आढळून आले आहे.
आज दिवसभरात पन्नासच्या आत आकडेवारी आली आहे. जिल्ह्यातील आकडेवारीनुसार आजवर एकुण १ लाख ४१ हजसा ९३४ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १ हजार ३६५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली.