भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

चाळीसगाव वगळता जळगाव जिल्ह्यातील तालुक्यात ८ पेक्षा कमी कोरोना बाधित रुग्ण

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक २५ रुग्ण कोरोना बाधित आढळले असून जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यात ८ पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत ही अत्यंत दिलासा दायक बातमी आहे, जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८० कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे २४२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर – ०७, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ-०६, अमळनेर-०३, चोपडा-०५, पाचोरा-०८, भडगाव-००, धरणगाव-०१, यावल-०३, एरंडोल-०४, जामनेर-०४, रावेर-०४, पारोळा-०२, चाळीसगाव-२५, मुक्ताईनगर-०२, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ८० रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४१ हजार ३६९ पर्यंत पोहचली असून १३६ हजार ६८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५६० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर २१२५ रुग्ण सध्या उपचार घेताय.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!