भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

कोरोना हारतोय..! आज जिल्ह्यात १६९ कोरोना बाधित रुग्ण

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)।जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १६९ बाधित रूग्ण आढळले आहे. तर २७८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. दिवसभरात आज ४ बाधितांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.

जळगाव शहर-२०, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-११, अमळनेर-०, चोपडा-६, पाचोरा-७, भडगाव-५, धरणगाव-०, यावल-२०, एरंडोल-१, जामनेर-२३, रावेर-१२, पारोळा-१२, चाळीसगाव-४२, मुक्ताईनगर-३, बोदवड-४ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १६९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ३९ हजार ५०० बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३० हजार ५५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित ६ हजार ४२६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच ४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!